जमिनीच्या वादातून अन्याय होत असल्याचा आरोप; औंधच्या व्यक्तीचे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

by Team Satara Today | published on : 30 September 2026


सातारा : औंध (ता. खटाव) येथील जीवन महादेव कांबळे यांनी गट क्रमांक ३६३ मधील जमिनीच्या वादातून आपल्यासह कुटुंबावर मानसिक, सामाजिक व आर्थिक अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात माजी सनदी अधिकारी भरत शितोळे, रणजीत पवार व त्यांच्या कुटुंबीयांवर विविध आरोप केले आहेत. आपल्या कुटुंबाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून महसूल व पोलिस प्रशासनाकडूनही योग्य दखल घेतली जात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. गट क्रमांक ३६३ बाबतचे फेरफार बेकायदेशीररीत्या रद्द करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी, संबंधित फेरफार प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करावी, तसेच संबंधित व्यक्तींच्या मालमत्ता व दूरध्वनी संपर्कांची चौकशी करावी, अशा मागण्या त्यांनी निवेदनातून केल्या आहेत. या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोवई नाका–बॉम्बे रेस्टॉरंट मार्गावर अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’; काँक्रिटीकरणामुळे चार महिने वाहतूक बदल; एसटीसह ट्रक, डंपर, कंटेनरला पर्यायी मार्ग
पुढील बातमी
जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला वेग; ७४ अर्ज दाखल; शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता

संबंधित बातम्या