सातारा : विकासनगर, सातारा येथून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संभाजी अंकुश शिंदे रा. पिंपरी मुरवाडी, जि. पुणे हे पुण्याला राहत्या घरी जातो, असे सांगून विकास नगर येथून बेपत्ता झाले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.