सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रेम विश्वकर्मा रा. संगमनगर, सातारा याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.