सातारा : विलासपूर गोळीबार मैदान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संग्राम बर्गे व मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वह्या, पुस्तके व इतर साहित्याचे वितरण या वेळी करण्यात आले. हे साहित्य हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शिक्षणासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी संग्राम बर्गे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प या वेळी संयोजकांनी व्यक्त केला.
या प्रसंगी निर्मल पवार, आबा शिंदे, दीपक सुतार, महेश चौगुले, विजय पवार, निलेश पाटील, गणेश नलवडे, यश सूर्यवंशी, बरकत बेग, कौस्तुभ शिंदे यांच्यासह मित्रपरिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.