05:20pm | Dec 24, 2024 |
नवी दिल्ली : पेप्सिको इंडियाच्या रिव्होल्युशनरी अवार्ड्स 2024 मधील प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ नेटिव इंडिजिनस फूड सिस्टीम मधील विजेतेपद महाराष्ट्रातील पारखी ऍग्रीच्या अध्यक्षा मोनिका मोहिते यांना प्राप्त झाले. पीकांचे रोटेशन आणि वैविध्यपूर्ण पीकांची लागवड यांसारख्या नवकल्पक सरावांच्या माध्यमातून उत्पादकता आणि जैवविविधता वाढवण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतींची क्षमता दाखवून मोनिकाने पारंपारिक शेतींचे भरभराटीमध्ये रूपांतरित करून शाश्वत शेतीसाठी एक मापदंड तयार केला आहे.
प्रगतीची भागीदारी या तत्वज्ञानातून प्रोत्साहन घेऊन, पेप्सिको इंडियाने नवी दिल्ली येथे रिव्होल्युशनरी कॉन्फरन्स अँड अवार्ड्स 2024 ची सुरुवात करून कृषी क्षेत्रातील महिलांना सक्षम बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची खात्री केली. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्यात महिलांच्या असाधारण योगदानाची दखल घेण्यात आली. नेतृत्व आणि नाविन्यपूर्ण प्रेरणादायी उदाहरणे निर्माण करण्यासाठी भारतभरातील दहा महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रातील अर्थपूर्ण योगदानासाठी निवडण्यात आले. प्रा. रमेश चंद, सदस्य, NITI आयोग यांच्या अध्यक्षतेखालील क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या बाह्य ज्यूरीने नामांकनांचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर त्यांची निवड करण्यात आली.
विजेत्यांना पुरस्कार प्रमुख अतिथी जलशक्ती राज्यमंत्री डॉ. राजभूषण चौधरी, माजी महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, प्रमुख वक्ते श्री. अजित बालाजी जोशी, सचिव, कृषी व शेतकरी कल्याण विभाग, पंजाब सरकार यांच्या हस्ते देण्यात आले.
मोनिकाच्या शेतीमध्ये 150 पेक्षा जास्त आंब्याची झाडे, 70 शेवगा, 80 चिकूची झाडे, पाच जांभूळची झाडे आणि विविध प्रकारची फळे, शेंगा, भाज्या, ऊस, सोयाबीन आणि सीताफळ आहेत. ही समृद्ध जैवविविधता मोर, चिमण्या, साप, मधमाश्या, फुलपाखरे आणि इतर अगणित प्रजातींची वस्ती असलेल्या संबंधित इकोसिस्टीमसाठी योग्य ठरते, ज्यामुळे शेती आणि निसर्ग यांच्यात अखंड संबंध निर्माण होतो. मोनिकाच्या प्रयत्नांमुळे मातीतील कार्बनचे प्रमाण अंदाजे 1.3% अशा सर्वोत्तम पातळीवर राखले गेले आहे, ज्यामुळे उत्पादनातील आवश्यक पोषक घटक आणि ऑईल जतन करून उत्पादकता लक्षणीयरीत्या वाढते. तिच्या शेतामध्ये पाण्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पावसाचे पाणी साठवण्याचे तंत्र देखील वापरले गेले आहे आणि सेंद्रिय उत्पादने तयार केली जातात जसे की सोय फ्लोर, लहान मुलांना आवश्यक पदार्थ, प्रत्येकासाठी आणि प्रौढांसाठी लॅक्टोज-इनटॉलरंट उत्पादने.
याव्यतिरिक्त, मोनिका मोरिंगा पावडर तयार करते, जे एक खनिज-समृद्ध सुपरफूड आहे, आणि पोषक तत्वांनी युक्त देशी चिकन ब्राऊन एगच्या उत्पादनास समर्थन देते. मोनिका ही ICAR, भोपाळ द्वारे प्रशिक्षित प्रमाणित तज्ञ असून शाश्वत आणि आरोग्य-केंद्रित शेती पद्धतींसाठी एक आदर्श उदाहरण आहे.
या कार्यक्रमात 150 हून अधिक कृषी क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग होता, ज्यात धोरणकर्ते, कृषी शास्त्रज्ञ, ओपिनियन लिडर, कॉर्पोरेट्स आणि शिक्षणतज्ञ यांचा समावेश होता आणि हा कार्यक्रम कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग साजरा करण्यासाठी आणि त्यांना सशक्त बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |