- कोरेगाव : मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुभाष परशुराम बर्गे (वय ५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी रविंद्र यल्लप्पा शिवनगी उर्फ राठोड याला अटक करण्यात आली आहे.
- याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ९ मे २०२६ रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव येथील आझाद चौक ते बाजारपेठ रस्त्यावरील एका देशी दारू दुकानासमोर दारूची बाटली देण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून आरोपी रविंद्र यल्लप्पा शिवनगी उर्फ राठोड (रा. कोरेगाव) याने पांढऱ्या रंगाच्या पाईपने सुभाष बर्गे यांच्या डोक्यात, छातीवर व पायावर मारहाण केली.
- या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बर्गे यांच्यावर प्रारंभी कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अतुल रमेश जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- आरोपी रविंद्र यल्लप्पा शिवनगी उर्फ राठोड याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून शनिवारी न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर करत आहेत.
कोरेगावात मारहाणीत झालेल्या खूनप्रकरणी एकास अटक ; एका व्यक्तीला लोखंडी पाईपने बेदम
by Team Satara Today | published on : 16 May 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा