सातारा : सातार्यातील मार्केट यार्ड परिसरात पती-पत्नी दोघे जात असताना तिघांनी महिलेचा व्हिडीओ करुन विभयभंग करत पतीला मारहाण केली. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमनराज बागवान, दस्तगीर बागवान, अमजद बागवान (तिघे रा.सातारा) यांच्या विरुध्द महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही घटना दि. 13 मे रोजी घडली आहे. तक्रारदार महिला पतीसोबत निघाली होती. त्यावेळी संशयित तेथे व्हिडीओ करत होते. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने युवकांना हटकले. यावर संशयित युवकांनी थेट महिलेला जवळ ओढले. ’तुझा व्हिडीओ करायला तू काय एकटीच आहे का. काय करायचे ते कर,’ असे म्हणत धमकी देवून महिलेचा विनयभंग केला. यावेळी पतीने युवकांना हटकले असता संशयितांनी पतीला हाताने मारहाण केली. तसेच यावेळी संशयितांनी 2 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या सर्व घटनेनंतर तक्रारदार महिलेने पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली.