09:38pm | Oct 26, 2024 |
कराड : कराड तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड वाहनातून नेली जात असताना तळबीड पोलिसांनी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मोठ्या रकमा वाहनातून नेल्या जात असल्याने पोलीस दल अलर्ट असून जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक पोस्टवर कसून तपासणी केली जात आहे.
ज्या वाहनातून १५ लाख रुपयांची वाहतूक केली ते वाहन देखील तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान तासवडे टोल नाक्यावर सापडलेली १५ लाख रुपये नेमके कोणाचे? कोठून कोठे चालले होते याचा पोलीस तपास सुरू झाला असून लवकरच त्याची माहिती मिळणार आहे. सध्या हे वाहन व रोकड पोलीसाच्या ताब्यात आहे. काहीच दिवसांपूर्वी हवाला माध्यमातून तीन कोटी रक्कम लुटली होती ती जशीच्या तशी हस्तगत करण्याची कामगिरी एसपी समीर शेख यांच्या कराडच्या शिलेदारांनी केली होती. आता त्याच प्रमाणे तपासनी दरम्यान टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने, तासवडे टोल नाका येथे तळबीड पोलीस ठाण्याद्वारे एक विशेष कारवाई करण्यात आली. 26 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 01:00 ते 04:00 या वेळेत, कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक GJ 27 EE 8738 ला संशयास्पद स्थितीत आढळल्यामुळे 02:30 वाजता थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, वाहनामध्ये 15 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. सदर वाहन व रोख रक्कम तात्काळ तळबीड पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आली. घटनेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून पुढील तपासासाठी वाहन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कुठून आली व ती कोणाकडे जाणार होती, याचा तपास सुरू आहे. निवडणूक प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर पुढील तपासणीसाठी मागील व पुढील लिंकचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
राज्यात विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपात रोकडी ऐन आचारसंहिता काळात कारवाई करून पोलिसांकडून जप्त केल्या जात असल्याचे चित्र आहे. निवडणुकांचा फिवर जसा जवळ येईल तसे अधिक कसून तपासण्या होत राहतील, असा संदेश सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी करवाईतून दिला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |