सातारा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे शिंदे शिवसेना गटाच्या वतीने दहन करण्यात आले. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवतीर्थावर राऊत यांच्या पुस्तकाचे दहन करत तीव्र संताप व्यक्त केला. संजय राऊत हे सुपारीबाज नेते असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.या आंदोलनाच्या वेळी महिला आघाडीचे अध्यक्ष शारदाताई जाधव, युवा सेना जिल्हा संघटक राजू केंजळे, विद्यार्थी सेनेचे संभाजी पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन काटे, शहर प्रमुख निलेश मोरे, अमोल इंगोले, अमोल खुडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.या आंदोलनासंदर्भात बोलताना रणजीत भोसले म्हणाले, संजय राऊत यांच्या खोटारड्या बुरख्यातील विचारांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे आम्ही आज येथे दहन करत आहोत. गेल्या पंधरा दिवसात या पुस्तकाची चर्चा होते आहे. राऊत जेलमध्ये गेले कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर नाही तर भ्रष्टाचाराचा डाग घेऊन गेले. बाळासाहेबांची शिवसेना व महाराष्ट्रातील हिंदुत्व संपवण्याची सुपारी त्यांनी घेतली आहे. हा सुपारीबाज राऊत आमच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढत असेल तर यापुढे सहन केले जाणार नाही. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. यापुढे संजय राऊत सातार्यात आल्यास त्यांना चांगली अद्दल घडवू, असा इशारा भोसले यांनी दिला.
खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाची सातारमध्ये होळी
शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी-कार्यकर्ते शिवतीर्थावर आक्रमक
by Team Satara Today | published on : 03 June 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026
४० हजार रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
January 16, 2026
सातारा एमआयडीसी व यशोदानगर येथून दुचाकी वाहनांची चोरी
January 16, 2026