गुढी पाडवा उत्साहात साजरा

सोने, वाहन खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

by Team Satara Today | published on : 31 March 2025


सातारा : साडेतीन मुहुर्तापैकी एक सण म्हणजे गुढी पाडवा. या सणाला राजधानी साताऱ्याला एक वेगळी पंरपरा आहे. साताऱ्यात सगळे सण, उत्सव नागरिक गुण्यागोविंदाने साजरे करत आहेत. गुढी पाडवा हा हिंदू धर्मियांचा सण आहे. गुढी पाडव्याचा सण साताऱ्यात गुढ्या उभारुन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सोशल मिडीया तसेच थेट संवाद करत एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या गुढी पाडवा सणाचे औचित्य साधून वाहन खरेदी करणे, घर बुकींग करणे, सोने, चांदी खरेदी करणे याकडे नागरिकांनी पसंती दिली.

साताऱ्यात गुढी पाडव्याचा सण हा मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. या सणाचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जात असल्याने अनेक ठिकाणी नव्या स्मिमचे नारळ फोडण्यात आले. बाजार पेठेत मोठी उलाढाल झाली.

विशेषत: वाहन व्यवसायात दुचाकी, चार चाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. मार्च एण्ड असला तरीही काहींनी रोख कॅश भरुन वाहने आपल्या दारात आणून पुरोहितांच्या हस्ते पूजन करण्याची घाई सुरु होती. दरम्यान, साताऱ्यात हिंदू बांधवांनी आणलेला कळकास धूवून त्यास घरातल्या महिलांनी रांगोळ्या काढून त्या उभारल्या गेल्या होत्या. तर सायंकाळी सुर्य मावळण्यापुर्वी त्या उतरवल्या गेल्या. घरोघरी गोडाचे पूरणपोळ्याचे जेवण करण्यात आले होते. मराठी नवीन वर्ष असल्याने नवीन संकल्प करुन एकमेकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत हा सण साजरा करण्यात आला.

बाजारपेठेत सवलतींचा वर्षाव
बहुतांश दुकानातील वस्तुंच्या विक्री मोठ्या प्रमाणात व्हाव्यात यासाठी दुकानांमध्ये नागरिकांना वस्तूंची प्रलोभनेही दिली होती. तर गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर घर खरेदीसाठी विविध ऑफर देण्यात आल्या होत्या. या गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर फ्लॅट खरेदी केल्यास ५ ग्रॅम सेन्याची ऑफरही देण्यात आली होती. तर काहींनी मॉडयुलर किचनची ऑफर दिली होती.

छोट्या गुढीचा ट्रेंड
मराठी नववर्षानिमित्ताने घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा वर्षानुवर्षे रुजली आहे. उंच गुढी उभारण्याची परंपरा अद्यापही काही घरांमध्ये कायम दिसत असली तरी आता वाढत्या गृहसंकुलामुळे आणि जागेच्या मर्यादेमुळे सहा फुटापासून बारा फुटांपर्यंत गुढी उभारण्यात आली होती.

बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल
सोने, चांदी, रिअर इस्टेट, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तु घेण्याकडे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात कल राहिला. यामुळे गेल्या काही महिन्यात बाजारपेठेत असणारे मंदिचे सावट दूर झाले. गुढी पाडवा हा साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्याने अनेकांनी याचे औचित्य साधून सोने, चांदी सह वाहने व इलेक्ट्रॉनिक वस्तु घेतल्या. मोबाईल दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी राहिल्याने कोट्यावधी रुपयांची उलाढाल साताऱ्याच्या बाजारपेठेत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा येथे श्रीराम महायज्ञ, श्रीराम नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ
पुढील बातमी
महिलेला खिडकीला बांधून घरावर सशस्त्र दरोडा

संबंधित बातम्या