दोन दुचाकींची चोरी

by Team Satara Today | published on : 29 March 2025


सातारा : सातारा शहरासह तालुक्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिहे, ता. सातारा येथील जिव्हाळा मंगल कार्यालयाच्या पार्किंगमधून  दि. 25 रोजी अज्ञाताने दुचाकीची (एमएच 11 सीबी 1264) चोरी केली. माध्यमिक शिक्षक अनंत संपत यादव (वय 52, रा. विलासपूर, सातारा, मूळ. रा. सासपडे, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार राऊत तपास करत आहेत.

दुसर्‍या घटनेत, येथील पंतांचा गोट येथे दि. 17 रोजी घराच्या पार्किंगमध्ये उभी असलेली दोन दुचाकींची (एमपी 09 जे 2393 व एमएच 18 ई 5204) अज्ञाताने चोरी केली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अनिकेत विजय बैताडे (रा. पंतांचा गोट, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार देशमुख तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी 13 कोटी 46 लाख 34 हजाराचा निधी मंजूर
पुढील बातमी
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी दोनजणांवर कारवाई

संबंधित बातम्या