सातारा : आकाशवाणी झोपडपट्टी येथील वेताळबा मंदिराजवळ शेजारी राहणाऱ्या दोघांमध्ये पावट्याच्या शेंगा तोडल्याच्या कारणावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक २४ रोजी तक्रारदार नयुम जाफर शेख (वय ३१ रा. झोपडपट्टी) हे त्यांच्या लहान मुलाला घेऊन गाडीवर बसलेले असताना अभिजीत अधिकराव अवघडे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी) याने दारूच्या नशेत तुझ्या पोरानं आमच्या पावट्याच्या शेंगा का तोडल्या? असे विचारणा करून रागाच्या भरात शेख यांना हाताने मारहाण करून धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आहे. सोबत असलेल्या लहान मुलाला देखील धक्का दिला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करत आहेत.