सातारा : रेवडी (ता. कोरेगाव) येथे घरात चहा बनविताना गॅसचा अचानक भडका उडाल्याने गंभीररीत्या भाजलेल्या 81 वर्षीय महिलेचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनुसया रघुनाथ पवार असे मृत महिलेचे नाव आहे.
अनुसया पवार या 11 ऑगस्ट रोजी घरात चहा बनवत असताना अचानक गॅसचा भडका उडाला. या दुर्घटनेत त्या गंभीर भाजल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच 15 ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास डॉक्टर कनक सोळंके यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची प्राथमिक माहिती ससून रुग्णालयाकडून पुण्यातील बंडगार्डन पोलिसांना देण्यात आली.