पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक

सातारा : पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात चोरट्यांनी वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास गायत्री हाऊसिंग सोसायटी ते शाहूपुरी चौक रस्त्यावर पिंगळे हॉस्पिटल जवळ दोन अनोळखी इसमांनी तेथीलच विजय नारायण लाड यांना आम्ही पोलिस आहोत. या एरियामध्ये चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. तुमच्या गळ्यातील चेन काढून ठेवा, असे सांगून लाड यांनी हातात काढलेली सहा तोळे वजनाची, अडीच लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करीत आहेत.


मागील बातमी
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा

संबंधित बातम्या