आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रुप अध्यक्षासह साऊंड सिस्टिम मालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 12 April 2025


सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रुप अध्यक्षासह साऊंड सिस्टिम मालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास परळी, ता. सातारा गावच्या हद्दीत श्रीमंत बॉईज ग्रुप चे अध्यक्ष अक्षय दळवी यांनी स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन व इतर प्रशासकीय परवानगी न घेता विनापरवाना विहित वेळेनंतर अश्लील गाण्यावर मुलींना अश्लील नृत्य करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रकरणी दळवी यांच्यासह एसआरएस आर्यन साऊंड सिस्टम च्या मालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मंडले करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
सातारा वॉरियर्सचा महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये दमदार प्रवेश

संबंधित बातम्या