महामार्गावर बोरगाव पुलाजवळ भरधाव ट्रक डिव्हायडरवर आदळून पलटी; रेलिंगचे नुकसान, चालकाविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 July 2026


सातारा : मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव पुलाजवळ भरधाव मालट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक डिव्हायडरवर आदळून पलटी झाला. या अपघातात महामार्गावरील लोखंडी रेलिंगचे नुकसान झाल्याने चालकाविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद भरत खेडकर (वय 30, रा. अगसखंड, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) हा एमएच-15-एचएच-0562 क्रमांकाचा ट्रक सातार्‍यावरून कराडकडे घेऊन जात असताना शुक्रवारी पहाटे सुमारे 4.20 वाजता हा अपघात झाला. भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविताना ट्रक प्रथम डिव्हायडरला धडकला आणि त्यानंतर रेलिंग तोडत पलटी झाला.

या अपघातात सरकारी मालमत्तेसह ट्रकचेही मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमोल कणसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सायबर गुन्ह्यातील रक्कम खात्यात जमा; धुमाळवाडीतील युवकाविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
कोंढवे गावाच्या हद्दीत अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या