एकाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 12 April 2025


सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी वृषभ रमेश साळुंखे रा. राजगुरुनगर, चाकण, ता. खेड, जि. पुणे हे त्यांच्या दुचाकी क्र. एमएच 14 जेजी 4010 वरून कुणाल नंदू पवार रा. विठ्ठल नगर, लांडेवाडी, भोसरी, पुणे यांच्याबरोबर पुणे-सातारा असे येत असताना त्यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी बेदरकारपणे भरधाव वेगाने चालवल्याने महामार्गावरील वाढे फाटा येथील हॉटेल विठ्ठल कामत च्या येथे अपघात झाला. या अपघातात कुणाल पवार या युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ऋषभ साळुंखे यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा नगरपालिकेचा दणका
पुढील बातमी
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या