जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 19 April 2025


सातारा : जुगार प्रकरणी बोरगाव पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आला असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पाडळी, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच राजेंद्र भिकाजी गुरव, संजय रामचंद्र ढाणे, सुरेश शिवाजी ढाणे, संजय जनार्दन कदम, मानसिंग बाबुराव ढाणे हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि तीन मोटरसायकल असा एक लाख 46 हजार 830 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू
पुढील बातमी
वेगवेगळे मीडिया, जुगाराचे ऍप, ऑनलाईन गेम्स वर निर्बंध घालावेत

संबंधित बातम्या