महाराष्ट्रात पुढील 48 तासांत अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता; घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता, जिल्हानिहाय अलर्ट एका क्लिकवर

by Team Satara Today | published on : 04 July 2026


पुणे: राज्यात गेल्या 48 तासापासून संततधार पाऊस सुरू असून पुन्हा आगामी 48 तास अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा इन्सॅट थ्री डी आर या उपग्रहाने काढलेल्या छायाचित्राद्वारे हवामान खात्याने दिला आहे.

पुढील 48 तास महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार असून कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. भारतात नैऋत्य मान्सून सक्रिय अवस्थेत आहे. मध्य भारत, पश्चिम किनारपट्टी, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर दाट ढग दिसत आहेत. बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता येत असून पश्चिम किनारपट्टीवर ऑफ-शोअर ट्रफ सक्रिय आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील पुढील 48 तासांचा अंदाज

कोकण विभाग (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार

काही भागांत मुसळधार पाऊस (100 मिमीपेक्षा जास्त) होण्याची शक्यता.

नदी-नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर) मध्यम ते जोरदार पाऊस

घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता.

सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये अधूनमधून जोरदार सरी

मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव)पुढील 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस.

पुढील 24-48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.

जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरी.

जाफराबाद आणि सिल्लोड तालुक्यांत दुपारनंतर आणि रात्री पावसाच्या सरींची शक्यता.

विदर्भ (अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर)जोरदार पावसाची शक्यता

पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस.

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया येथे काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता.

पश्चिम विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस.

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव) नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता.

जळगाव आणि धुळ्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस.

घाट परिसरात धुके आणि सतत रिमझिम पाऊस.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने 6 जुलैपर्यंत वाहतूकीसाठी बंद
पुढील बातमी
महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावात काही भाग खचला; प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

संबंधित बातम्या