साताऱ्यातील वृद्धाची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 October 2026


सातारा : वृद्धाची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंजे येथे राहणाऱ्या बाळ गंगाधर गाढवे यांना 9 ऑगस्ट 2026 पासून एका महिलेने ती एका कंपनीची प्रतिनिधी असल्याचे खोटे सांगून एका ॲपद्वारे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून तसेच नफा झाल्याचे भासवून वेळोवेळी गुंतवणूक करण्यास सांगून वृद्धाची एक कोटी 71 लाख 31 हजार 848 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह गुल टेकचंदानी त्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील करंजे पेठ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
पुढील बातमी
सातारा-कोरेगाव रस्त्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या