दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविण्यासाठी शिबीरांचे आयोजन

by Team Satara Today | published on : 10 July 2025


सातारा :  केंद्र शासनाच्या एडिप योजनेतंर्गत्त अलिम्को या शासनमान्य संस्था संचलित एस. आर. ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा जिल्हयात ऑन द स्पॉट निःशुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे प्रत्येक तालुक्याच्या गट विकास अधिकारी कार्यालयात आयोजन  करण्यात येणार आहे.  तज्ञ  पथकाकडून दिव्यांगांना कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्स मोजमाप घेऊन जाग्यावरच वितरण करणार आहेत. या शिबीराचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.

शिबीरांचे आयोजन पुढील प्रमाणे पंचायत समिती, सातारा व जावली २१ जुलै,  पंचायत समिती, वाई व खंडाळा २२ जुलै,    पंचायत समिती, फलटण २३ जुलै,   पंचायत समिती, कोरेगाव २४ जुलै, पंचायत समिती, माण व खटाव २५ जुलै,   पंचायत समिती, महाबळेश्वर २६ जुलै ,   पंचायत समिती, पाटण २८ जुलै  व  पंचायत समिती, कराड ३० जुलै या ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यवतेश्वर घाटामध्ये कोसळली दरड
पुढील बातमी
मिरवणूक बेंदूर सणाची

संबंधित बातम्या