अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा जागतिक बाजाराला फटका; कच्च्या तेलाच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ

by Team Satara Today | published on : 16 July 2026


नवी दिल्ली: अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. अमेरिकेने इराणी लष्करी तळांवर केलेल्या या हल्ल्यांमुळे हा संघर्ष आणखी भडकण्याची आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) होणारा ऊर्जा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ब्रेंट क्रूडचा दर ०.४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $८५.२८ वर पोहोचला आहे, तर अमेरिकन वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट (WTI) ०.५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $८०.०२ झाले आहे. चालू संघर्षापूर्वी जागतिक तेल आणि लिक्विफाइड नॅशनल गॅस (LNG) व्यापाराचा सुमारे एक पंचमांश (१/५) भाग याच सामुद्रधुनीतून हाताळला जात होता, ज्याला आता या हल्ल्यांमुळे फटका बसला आहे. आखाती देशांमधून होणारी तेल निर्यात अशीच खंडित राहिली, तर चौथ्या तिमाहीत ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $११० च्या पार जाऊ शकते.

अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, इराणचेही चोख प्रत्युत्तर

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणी बंदराच्या दिशेने जाणाऱ्या एका तेलवाहू जहाजावर अमेरिकन लष्कराने 'हेलफायर' क्षेपणास्त्रांचा मारा केला. तर दुसरीकडे अमेरिकेकडून इराणवर हल्ल्यांची दुसरी मालिका सुरू आहे. इराणमधील कशम बेट, बंदर अब्बास आणि चाबहार भागात प्रचंड स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

इराणने संपूर्ण आखाती देशांच्या परिसरात प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले आहेत. बहरीनमध्ये धोक्याचे इशारे वाजले, तर कुवेतने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच पाडल्याचा दावा केला. रोममधील चर्चेनंतर दक्षिण लेबनॉनमधून मर्यादित इस्रायली सैन्य मागे घेण्याच्या संरचनेवर आणि मार्गदर्शक तत्त्वांवर लेबनॉन आणि इस्रायलचे एकमत झाल्याची अमेरिकेची माहिती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
E20 पेट्रोलमुळे कारमध्ये गंभीर बिघाड झाल्याचा दावा; ग्राहक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय, कंपनीला नवी कार देण्याचे आदेश
पुढील बातमी
जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हॉर्मुझमध्ये पुण्यातील मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू

संबंधित बातम्या