बदलापूरनंतर कोल्हापूरमध्ये  दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

by Team Satara Today | published on : 22 August 2024


कोल्हापुर : गेल्या काही दिवसांपासून देशभरातून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतेच बदलापूरात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्माचाऱ्याने अत्याचार केल्याने राज्यातील नागरिकांत संताप असताना आता कोल्हापूरातून एक घक्कादायक घटना समोर आली आहे.

कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरात दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. सबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतााना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलगी मूळची बिहारची असून, ती आपल्या आई-वडील आणि पाच भावंडांबरोबर रामनगर परिसरात राहत होती. मुलीचे आई-वडील शिरोली एमआयडीसीतील एका कारखान्यात मजूर म्हणून कामाला जात होते.

सकाळपासून मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांत काल सायंकाळी तक्रार दाखल केली होती.

यानंतर आज पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने मुलीला शोधून काढले. शियेपासून काही अंतरावर असलेल्या शेतात या पीडित मुलीचा मृतदेह पडलेला सापडला.

मुलीचा मृतदेह आता वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर याबाबत अधिकचा खुलासा करता येईल असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान आज ही घटना उघडकीस आली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम सुरू होता.

या कार्यक्रमानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "या घटनेची आम्ही माहिती घेतली असून कोण्यातील गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल."

याच प्रकरणावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पीडित मुलगी ही मुळची बिहारची आहे. काल तिला तिच्या काकांनी मारल्यानंतर ती घराबाहेर बडली आणि बेपत्ता झाली. त्यानंतर रात्री 10 वाजता ती सापडत नसल्याची तक्रार दाखल झाली. आज सकाळी पोलिसांना एका उसाच्या फडत पीडितेचा मृतदेह सापडला. दरम्यान या प्रकरणात काही संशयीतांना अटक केली असून, पोलीस तपास करत आहे. बिहारच्या या पीडित कुटुंबाला सरकारकडून आम्ही योग्य ती मदत करू."


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मेढा येथे 26 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
पुढील बातमी
महिला अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

संबंधित बातम्या