करंजे पेठ येथे एकता कॉलनीत खड्डे काढण्यावरून वाद; एकासह तीन कामगारांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 16 March 2026


सातारा  : एकता कॉलनी करंजे पेठ येथे जमिनीच्या मालकीवरून दोघांच्यात वाद सुरू आहेत. हा वाद कोर्टात देखील चालू आहे, असे असताना देखील सचिन धादमे यांनी वादग्रस्त जमिनीमध्ये कामगारांकडून कंपाऊंड करण्यासाठी खड्डे काढून अतिक्रमण करत असताना फिर्यादी हरूण शहाबुद्दीन आगा (वय ३९, .ता कॉलनी, सातारा) यांनी सचिन धादमे यांना 'खड्डे काढू नका' असे सांगितले. 

यावेळी धादमे यांनी त्यांच्या कामगारांना खड्डे काढण्याचे काम सुरू करा त्याचे काय ऐकू नका असे म्हणताच कामगारांनी खड्डे काढण्याचे काम सुरू केले. यावेळी कामगारांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या अंगावर धावून जात आम्हाला मालकाने सांगितला आहे.त्यामुळे आमचे काम आम्हाला करू द्या, यासाठी आम्हाला हजार रुपये दिलेले आहेत. तुम्ही आणि तुमच्या शेजारी काय असेल ते बघून घ्या मात्र आम्हाला खड्डे खोदू द्या तुम्ही खड्डे खोदण्यास आडकाठी  केली तर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी कामगार सचिन  धादमे, शुभम  धादमे,राजेश  धादमे (सर्व रा.,करंजे,सातारा) दिली. 

याप्रकरणी आगा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने चौघां विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरात पतीसमोर पत्नीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
बुध येथे भरधाव डम्परच्या धडकेत युवतीचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

संबंधित बातम्या