शिवसेना ठाकरे गटाच्या रणरागिणींची महिला आयोगाकडे धाव; सासपडे प्रकरणातील नराधमावर कठोर कारवाईची मागणी; पोलीस अधीक्षकांना निवेदन

by Team Satara Today | published on : 17 October 2025


सातारा :  सासपडे प्रकरणातील पीडितेला तात्काळ न्याय द्यावा आणि नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपनेत्या छाया शिंदे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे.

महिला आयोगाने घेतलेल्या जनसुनावणीवेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकार्‍यांनी रूपाली चाकणकर यांची भेट घेतली. या सुनावणीसाठी चाकणकर यांच्या शेजारी बसलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन दिले. यावेळी महिला आघाडीच्या फलटण संपर्कप्रमुख सुशीला जाधव, कल्पना गीते, संगीता जाधव, अमृता पाटील, कांता पवार, नंदा आठल्ये, दिव्या पवार, पायल पाटील, ऐश्वर्या पाटील, शिवसेना शहर संघटक प्रणव सावंत, आशुतोष पारंगे, राहुल जाधव, रवींद्र भणगे, शैलेश बोडके उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, सासपडे, ता. सातारा येथील 13 वर्षांच्या मुलीशी राहुल यादव या नराधमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुल यादव याने तिचा खून केला. हा प्रकार मानवतेला काळिमा फासणारा आहे. यातील आरोपी राहुल यादव सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. नराधमाला कठोर शासन करण्यात यावे. याबाबत योग्य निर्णय झाल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन उभे करेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
९९ व्या साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन; इतिहासात प्रथमच तरुण, लोकप्रिय लेखकाला कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा मान
पुढील बातमी
खंडाळ्यात ट्रकची तीन वाहनांना धडक; तीन जण जखमी; सुदैवाने जीवितहानी टळली

संबंधित बातम्या