मायणी : येथील मायणी व धोंडेवाडी शिवारात संजय गणपत साठे यांचे शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर जनावरे कापत असल्याची माहिती वडूज पोलीसांना प्राणीमित्रांमार्फत मिळाली.त्यानंतर पोलीसांनी रात्री आठ वाजता घटनास्थळी जाऊन एक टन गोमांस, चामडे, काही जिवंत जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरलेली वाहने असा एकूण ९ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर कत्तल करणारे संशयित आरोपी पोलीसांचा सुगावा लागताच पळून गेल्याचे पोलीसांनी सांगितले.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणी मित्र वैभव किरण जाधव तासवडे (कराड), अंकुश पांडुरंग गोडसे (जैनवस्ती,सांगली),आशिष कमलाकर बाराके (घाटकोपर, पश्चिम मुंबई) व यशवंत शंकर सुर्वे (बैरागवाडी,सोलापुर) यांनी गोरक्षण अनुषंगाने धोंडेवाडी गावचे हद्दीत मायणी-धोंडेवाडी गावचे शिवेवर संजय गणपत साठे यांचे शेतातील पत्र्याचे शेडमध्ये बेकायदेशीर जनावरे कापत आहेत अशी बातमी दिली.
त्यानंतर पोलीसांनी मायणी-धोंडेवाडी शिवेवर संजय गणपत साठे यांचे शेतातील पत्र्याचे शेड छापा टाकला. त्यावेळी पोलीस गाड्यांचा सुगावा लागताच आरोपी ऊसाच्या शेतात अंधारातून पळून गेले. घटनास्थळी शेडमध्ये गोवंश जनावराचे कातडे, डोके पाय, धड असे कातडी काढलेली दिसले.तर चारचाकी वाहनात अंदाजे एक टन गोमांस, दुसऱ्या गाडीत दोन गोवंश जातीची जनावराची मुंडकी व एक धड मिळून आले.
पत्राशेडमध्ये गोवंश जातीचे ५१ कातडी काढलेले डोके, पाय, धड,पायांनी चार पोती भरलेली, कातड्याची १० पोती, निळ्या तीन ड्रम व बादलीमध्ये गोवंश जनावरांचे अवयव आढळून आले. शेडच्या पाठीमागील बाजूस तिरकस पश्चिमेस झाडांना डांबून ठेवलेली दोन देशी खिलार गाई, गिरगाई, बैल, जर्शी, चारचाकी वाहने व मयत अवस्थेतील गोवंश जातीचे चार खोड असा एकूण ९ लाख पन्नास हजारांचा पोलीसांनी जप्त केला.
दरम्यान वडूचे न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग एम.ए.एस.दर्यावधी यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, मायणीचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील कारवाई केली. त्यावेली पशुवैद्यकिय अधिकारी ऋषिकेश व्हनाळे, पोलीस पाटील प्रकाश आखाडे, प्रशांत पाटील हे उपस्थित होते.
मायणी-धोंडेवाडीत अवैध गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; एक टन गोमांसासह ९.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांची चाहूल लागताच संशयित पसार; मायणीतील कारवाईत गोमांस आणि वाहने जप्त
by Team Satara Today | published on : 19 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा