सातारा, दि. ११ : साताऱ्यात शेअर मार्केट चे कारण सांगून व उत्तम परतावा देण्याच्या आमिषाने 11 जणांची फसवणूक झाली आहे सातारा शहरात घडलेल्या विविध दोन घटनांमध्ये 29 जणांची एक कोटी 70 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकाराची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी गंभीर दखल घेतली आहे
11 जणांच्या फसवणूक प्रकरणी फिर्यादी कैलास हणमंत धुमाळ (वय ६०, रा. सदरबझार, सातारा) यांनी शाहीनाथ पारुजी घोलप (रा. नाशिक) याच्या विरुध्द दिली आहे. संशयित आरोपीने तक्रारदार व त्याचे अन्य ११ मित्र यांना शेअर्स मार्केटींगमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. पैशांची गुंतवणूक केल्यास ४ टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार व त्यांच्या मित्रांनी एकूण ३८ लाख रुपये गुंतवले. मात्र नफा व मूळ रक्कम न देता फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घडली आहे.