सातारा : सातारा शहरातील केसरकर पेठेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन 32 हजार 700 रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील केसरकर पेठेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी घरातून 32 हजार 700 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले. याप्रकरणी भाग्यश्री शिवाजी अवघडे (वय 52, रा. केसकर पेठ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कणसे करीत आहेत.
केसरकर पेठेत घरफोडी; 32 हजार 700 रुपये किंमतीचे दागिने लंपास
by Team Satara Today | published on : 02 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा