धारदार शस्त्रे नाचवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 22 April 2025


सातारा : करंजे, ता. सातारा गावच्या यात्रेचा माहोल सुरु असताना तिघांनी धारदार शस्त्रे नाचवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजू आवळे, तन्मय आवळे, आदित्य चव्हाण या तिघांविरुध्द पोलीस निलेश काटकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 21 एप्रिल रोजी घडली आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, संशयित तिघेजण करंजे येथून दुचाकीवरुन निघाले होते. यावेळी एकजण वाहन चालवत होता तर दोघांच्या हातात हत्यारे होती. संशयित तिघेजणही हत्यारे नाचवत, आरडाओरडा करत दहशत माजवत गेले. याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी समजल्यानंतर त्यांनी कारवाई करुन हत्यारे जप्त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडणी प्रकरणी लल्लन जाधव सह टोळीवर गुन्हा
पुढील बातमी
राहत्या घरातून एकजण बेपत्ता

संबंधित बातम्या