सातारा : पोक्सो प्रकरणी मेढा पोलिसांनी एकास अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर केल्याप्रकरणी राहुल आनंद कदम (रा. मुनावळे, ता. जावळी) याच्या विरोधात मेढा पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.