सातारा : घसरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 मे रोजी मनीषा मधुकर दळवी या त्यांची मुलगी पुनम कोकरे रा. मालगाव, ता. सातारा यांच्या घराच्या बाहेर असलेल्या बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.