सातारा : समर्थ मंदिर परिसरात ‘वाहन बाजूला घे’ म्हटल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी युवकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऋषभ हर्षवर्धन शिंदे (वय ३०, रा. मल्हार पेठ) असे त्याचे नाव आहे. याबाबत हवालदार देविदास मारोती लेंडेवाड यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २९ एप्रिलला ते समर्थ मंदिर चौक नेमणुकीला होते.
या वेळी शिंदे फोनवर बोलत गाडीवर बसून होता.२९ एप्रिलला ते समर्थ मंदिर चौक नेमणुकीला होते. या वेळी शिंदे फोनवर बोलत गाडीवर बसून होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याच्या कारणावरून त्यांनी शिंदे याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. या वेळी कॉलर पकडून धक्काबुक्की केली, तसेच सहकारी पोलिसांनाही शिवीगाळ केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक बागवान तपास करत आहेत.