सातारा : शहरातील मंगळवार पेठ परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे 60 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ रोजी दुपारी 5 ते रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान पूजा भालचंद्र छप्परकर रा. मंगळवार पेठ, सातारा यांच्या राहत्या घराचे कुलूप काढून, घरातील कपाटाचे दार उचकटून अज्ञात चोरट्यांनी 60 हजार रुपये किंमतीची, दीड तोळे वजनाची सोन्याची माळ चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक यादव करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
रविवार पेठ येथे एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा
October 23, 2026
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी सातारा जिल्ह्यात शांततेत मतदान
October 23, 2026