सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर-पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभ्ाूषण पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या प्रेरणास्थान कै. सौ. कलावती माने यांचा 30 वा पुण्यस्मृतीदिन उद्या दि. 11 रोजी संस्था कार्यालय माने कॉलनी, एम.आय.डी.सी. सातारा. या ठिकाणी संपन्न होत आहे.
संस्थेच्या प्रेरणास्थान कै. सौ. कलावती माने यांच्या पुण्यस्मृतीदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या विविध शाखांमधील गुणवंत विद्यार्थ्याच्या कर्तबगार मातांचा आदर्श मातापालक पुरस्कार वितरण सोहळा, त्याचप्रमाणे शासकीय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी योगदान देणार्या समर्थनगर, कोडोली, संभाजीनगर परिसरातील अंगणवाडी व आरोग्य सेविकांचा शिवकला कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, डॉ सौ. अरूणाताई बर्गे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. पुष्पा जाधव, नवनिर्वाचित सहाय्यक सरकारी अभियोक्ता सौ.श्वेता खरे यांच्या शुभहस्ते तसेच सौ. स्वाती भोसले, सरपंच ग्रा. पं. कोडोली, सौ. शुभांगी डोर्ले सरपंच, ग्रा. पं. समथर्र्नगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने संस्थेच्या सर्व शाखांमध्ये कै.सौ.कलावती माने यांना आदरांजली वाहण्यात येणार असून माने कॉलनी, एम.आय.डी.सी. सातारा. या ठिकाणी मुख्य कार्यक्रमामध्ये संस्था संचालक, शाळा व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पुष्पांजली वाहण्यात येणार आहे. त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रतिभा जाधव यांनी केले आहे.