आत्माराम तुकाराम भिडे  'तारक मेहता का उलटा चष्मा'  सोडणार असल्याची चर्चा

अभिनेता मंदारने केला खुलासा

by Team Satara Today | published on : 28 August 2024


मुंबई : गेली १४ हून जास्त वर्ष तारक मेहता का उलटा चष्मा मालिका सुरु आहे. ही मालिका गेली १४ वर्ष अविरतपणे प्रेक्षकांना खळखळून हसवतेय. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय. जेठालाल, दयाभाभी, मेहता साब, बापूजी, टप्पू असे अनेक कॅरेक्टर्स प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. तारक मेहता का उलटा चष्मामधील असंच एक लोकप्रिय कॅरेक्टर म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे. मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. पण अशातच मंदार हा शो सोडणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, याचा खुलासा स्वतः मंदारने केलाय. 

झालं असं की युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओच्या थंबनेलवरील फोटोंवर मंदारचा फोटो लावण्यात आलाय. या फोटोवर मंदारचा हात जोडलेला फोटो शेअर करण्यात आलाय. मेकर्सचा पर्दाफाश करेल असा संवाद या फोटोवर दिसत असून मंदार तारक मेहत... सोडणार असंही सांगण्यात आलंय. परंतु हा व्हिडीओ आणि त्यावरील फोटो हा दिशाहीन करणारा असून मंदार तारक मेहता.. सोडणार नाही, असा खुलासा त्याने केलाय.

मंदार चांदवडकरने सोशल मीडियावर याविषयी व्हिडीओ शेअर करुन खुलासा केलाय की, "मी तारक मेहता हा उलटा चष्मा सोडून जाणं ही एक निव्वळ अफवा आहे. लोक सोशल मीडियाचा खूप चुकीच्या पद्धतीने उपयोग करतात हे बघून वाईट वाटतं. या व्हिडीओवरील फोटो जेव्हा काही वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे ही निव्वळ अफवा आहे. २००८ पासून मी तुमचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे पुढेही असंच होईल यात शंका नाही." 

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवरायांच्या पुतळ्याशी संबंधित अन्य कोणतेही काम माझ्याकडे नव्हते : स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील 
पुढील बातमी
बौद्ध महामेळावा हजारोंच्या उपस्थितीत संपन्न

संबंधित बातम्या