गावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध : विरेंद्र शिंदे

वारागडे आळीच्या काँक्रिटीकरण रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री ना.बाबाराजेंचे जाहीर आभार : राहुल ननावरे

by Team Satara Today | published on : 17 August 2025


कुडाळ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी‌ आमदार स्थानिक विकास निधी मधून वारागडे आळी,‌ कुडाळ येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी तब्बल दहा लाख रु.चा निधी मंजूर करून दिला‌ होता. या रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ व भूमिपूजन आज कुडाळ येथे सातारा जिल्हा दिशा समिती सदस्य विरेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी  विरेंद्र शिंदे बोलताना म्हणाले, नेताजी वार्ड मधील वारागडे आळी येथील रस्ता मंजूर होण्यासाठी युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य राहुल ननावरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून हा रस्ता कॉंक्रिटीकरणच करण्यात यावा यावर मंत्री बाबाराजे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. या मंजूर झालेल्या काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमीपूजन प्रतापगड सहकारी कारखान्याचे संचालक राजेंद्र शिंदे, कुडाळ विकास सेवा सोसायटी चेअरमन मालोजी (आण्णा)शिंदे, पिंपळेश्वर पतसंस्था चेअरमन व किसनवीर कारखान्याचे माजी संचालक चंद्रसेन शिंदे, किसनवीर कारखान्याचे माजी संचालक अमृतराव शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम, ग्रामपंचायत सदस्य राहुल ननावरे, सौ.अर्चना वारागडे, सौ.सुधा रासकर, सौ.गौरी शिराळकर, श्रीमती.रुपाली कांबळे, ह.भ.प.हनमंत वारागडे, भाऊराव (आण्णा)शेवते, मोतीराम वारागडे, रामचंद्र सपकाळ, तानाजी वारागडे, भानुदास वारागडे, लक्ष्मण ननावरे, ज्ञानेश्वर (भाऊ) कुंभार, बबन किर्वे, समीर आत्तार, युवा नेते आशिष रासकर, उत्तम देवकर, गजानन वारागडे, तानाजी कृष्णात वारागडे, शामराव वारागडे, लहूजी वारागडे, नारायण जाधव, सुनील वारागडे, अविनाश गोंधळी, सावंत फौजी, राजेंद्र वारागडे, विष्णु शिंदे, लक्ष्मण (आप्पा)पवार, देवराम चौधरी, राजेंद्र सपकाळ, विलास शिंदे, प्रदीप शिंदे, विजय शिंदे, अनिल लोहार, प्रशांत शिंदे, नितीन ननावरे, संभाजी वारागडे, गणेश वारागडे, राजेंद्र व्यंकट शिंदे, प्रवीण वारागडे, नितीन गोळे, अमोल वारागडे, सागर जमदाडे, शशिकांत गलांडे, संजय ननावरे, मंगेश जाधव, समीर जमदाडे,आप्पा जाधव, अजित शिराळकर, विक्रम किर्वे, मंगेश कचरे, अनिकेत ननावरे, दत्तात्रय वारागडे, रोशन शिंदे, राजेंद्र वारागडे, अक्षय वारागडे, विकास जाधव, शंतनु शिंदे, यश वारागडे, महेश कदम, संदीप (आबा)पवार, योगेश पवार, सचिन माळेकर, अशोक पवार, अक्षय शेवते, विकास रासकर, राजेंद्र मदने, जावेद मोकाशी, महादेव रासकर, नितीन मोरे, सागर पवार, सनी पवार, वारागडे आळी येथील महिला, नवज्योत तरुण मित्र मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वारागडे आळी येथील रस्ता काँक्रिटीकरणाला निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य राहुल ननावरे व नागरिकांनी मंत्री बाबाराजे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वतःवर ब्लेडने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू : सरन्यायाधीश भूषण गवई

संबंधित बातम्या