सातारा : अपघात करून एकाच्या मृत्यूस आणि एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 17 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पुणे सातारा रस्त्यावर सदाशिव शंकर चव्हाण रा. लिंब, सातारा यांच्या दुचाकीस धडक देऊन त्यांच्या मृत्यूस तसेच दुचाकी वर मागे बसलेल्या शुभम शंकर सावंत राहणार नागेवाडी तालुका सातारा यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एनफिल्ड बुलेट क्र. एमएच 11 डीपी 8700 चा चालक मयूर रवींद्र सावंत रा. नागेवाडी, ता. सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये "आनंददायी शनिवार" उत्साहात साजरा
December 24, 2025
सातारा शहर पोलिसांचा सिव्हिल हॉस्पिटलनजीक जुगार अड्ड्यावर छापा
December 24, 2025
सैदापूर येथे डंपरच्या धडकेमध्ये निवृत्त शिक्षकाचा मृत्यू
December 24, 2025