दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने बँक अधिकार्‍याचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 21 June 2025


कोरेगाव : सातारा ते रहिमतपूर मार्गावर सायगाव (ता. कोरेगाव) गावच्या कमानीसमोर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आयडीबीआय बँकेच्या अधिकार्‍याचा मृत्यू झाला. तुषार सतीश कांबळे (वय 43, रा. कामाठीपुरा, सातारा) असे ठार झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. 

याप्रकरणी विश्वजीत विश्वास जाधव (रा. गोडोली, सातारा) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक नीलेश दिलीप तवटे (रा. मालगाव ता. मिरज जि, सांगली) याच्याविरोधात गुन्हा रहिमतपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तुषार कांबळे हे गुरुवारी सातार्‍याहून दुचाकीने रहिमतपूरकडे निघाले होते. सायगाव गावच्या हद्दीत ते आले असता समोरून येणार्‍या ट्रकने त्यांना धडक दिली. अपघाताच्या आवाजाने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कांबळे यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सौर कृषी पंपांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणचा पुढाकार
पुढील बातमी
तिसऱ्या भाषेसाठी तासिकांच्या वेळेला कात्री

संबंधित बातम्या