सातारा : सातारा जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत केंद्र शासनाच्या एडिप योजनेतंर्गत्त अलिम्को या शासन मान्य संस्था संचलित एस. आर. ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा जिल्हयातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांना कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स देण्यासाठी ऑन द स्पॉट निःशुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन सर्व तालुक्यांमध्ये करण्यात आले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार आदी उपस्थित होते.
यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांनी साहित्य मोफत मिळाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार माणून शिबिराबाबत समाधान व्यक्त केले.