धरणात 24 तासांत 3.02 टीएमसी पाण्याची वाढ; सध्या 70.88 टीएमसी पाणीसाठा, पावसाचा जोर कमी झाला

by Team Satara Today | published on : 24 July 2026


सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर, कोयनानगर, नवजा परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसाने थोडी विश्रांती घेतली असून पावसाचा जोर कमी झाला आहे. अधून-मधून मुसळधार सरी कोसळत आहेत. कोयना धरणात 24 तासांत 3.02 टीएमसी पाण्याची वाढ झाली असून धरणात सध्या 70.88 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात टप्प्याटप्प्यांनी पडणाऱ्या पावसाने कोयना धरणातील पाणी पातळी वाढू लागली आहे. आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोयना धरण परिसरात पडत आहे, त्यामुळे 50 ते 55 टीएमसी वर स्थिरावलेला धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.

कोयना धरणातून अद्याप पाणी सोडण्यात आलेले नसले, तरी पावसाच्या पाण्यामुळे कृष्णा-कोयना या प्रमुख नद्यांसह अन्य उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर, कोयनानगर, नवजा परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 24 तासांत 3.02 टीएमसीने वाढला आहे. आज शुक्रवारी (ता.२४) सकाळी आठ वाजता कोयना धरणात 70. 88 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

सध्या धरणामध्ये 35 हजार 10 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या 24 तासांत नवजा येथे 66 मिलीमीटर, कोयनानगरला 86 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला 78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या 70.88 टीएमसी भरले असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या लाठीचार्जविरोधात दोन याचिका; सर्वोच्च न्यायालयात २७ जुलैला सुनावणी ठरली

संबंधित बातम्या