सुमारे साडेतीन लाखांच्या फसवणूक प्रकरणी एका विरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 August 2024


सातारा : व्यापाऱ्याची सुमारे साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील शनिवार पेठेत असणाऱ्या जे.के. ट्रेडर्स नावाच्या किराणामालाच्या होलसेल दुकानातून दि. 19 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समीर ठक्कर रा. गुजरात याने दुकानाचे मालक जुबेरवली महंमद फलजानी रा. शनिवार पेठ, सातारा यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 3 लाख 43 हजार 152 रुपये किंमतीचा बारा टन तांदूळ मालट्रक क्र. एमएच 11 एएल 5249 ने गायत्री इंडस्ट्रीज कंपनी तरसाडी, गुरुकुल सुपा, नवसारी, राज्य गुजरात यांना लागणार असल्याचे सांगून तांदूळ पाठवला. यानंतर संबंधित कंपनीत स्वतःचा तांदूळ असल्याचे सांगून विक्री करून आलेले पैसे स्वतः घेऊन जुबेरवली फलजानी यांची 3 लाख 43 हजार 152 रुपयांची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाळकरी मुलाचा डेंग्यूने मृत्यू
पुढील बातमी
वाढे फाटा परिसरात टोळक्याचा धुडगूस; दोन अल्पवयीन ताब्यात

संबंधित बातम्या