नायजेरियात पेट्रोल टँकर स्फोटात ९० ठार

by Team Satara Today | published on : 17 October 2024


नायजेरिया : आफ्रिकेतील नायजेरिया देशात फूकट पेट्रोल मिळवण्‍याची हाव तब्‍बल ९० जणांचा जीवावर बेतली आहे. पेट्रोल टँकर स्फोटात ९० जण ठार झाल्‍याचे वृत्तमीडिया ने दिले आहे. या दुर्घटनेत ५० हून अधिक जण गंभीर जखमी असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

पेट्रोल टँकरला अपघात झाला. तो पलटी झाला. यावेळी फूकटचे पेट्रोल मिळण्‍यासाठी लोकांची झुंबड उडाली. या गर्दीत स्‍फोट झाल्‍याने ९० जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

जिगावा राज्यातील माजिया शहरात मध्यरात्री हा स्फोट झाला, जेव्हा विद्यापीठाजवळील महामार्गावरून प्रवास करताना टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टँकर पलटी झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी टँकरकडे धाव घेतली. ते पेट्रोल काढू लागले. याचवेळी प्रचंड मोठा स्‍फोट झाला. भीषण आग लागली. या आगीत९० पेक्षा अधिक लोक ठार झाले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे
पुढील बातमी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींची मोठी तयारी

संबंधित बातम्या