वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या आत्महत्या

by Team Satara Today | published on : 17 December 2024


सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान सैदापूर, ता. सातारा येथील एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत. 

दुसऱ्या घटनेत, अनिल कोंडीबा माने रा. दिव्य नगरी, कोंडवे, ता. सातारा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता
पुढील बातमी
अल्पवयीन मुलाचे अपहरण

संबंधित बातम्या