साताऱ्यात महिलेच्या विनयभंग प्रकरणी रेनावळे येथील एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 August 2026


सातारा : शहरातील एका अपार्टमेंटमध्ये 34 वर्षीय महिलेपुढे अश्लील वर्तन केल्याच्या आरोपावरून राहुल महादेव सणस (रा. रेनावळे, ता. जि. सातारा) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित महिलेपुढे अश्लील कृत्य केल्याने तिला मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच या प्रकारामुळे तिच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल सणस याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबाजार चौकातील मटका अड्ड्यावर छापा; एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठीचे अधिकार जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना प्रदान; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा आदेश, स्थानिक पातळीवरच कारवाई करण्याचा मार्ग मोकळा

संबंधित बातम्या