सातारा : चंदननगर-कोडोली परिसरातील श्रीदत्त अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने दुचाकी पळविल्याची घटना समोर आली असून, सातारा शहर पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदार सिंग मानसिंग शिंदे (वय 28, रा. चंदननगर-कोडोली, मूळ रा. देववाडी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी आपली दुचाकी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. 8 जुलैच्या मध्यरात्रीस अज्ञात व्यक्तीने वाहन चोरून नेल्याचे उघड झाले. या घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.