सातारा : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुलोचना मोहन लोहार रा. कुष्ठरोग वसाहत, मतकर कॉलनी शेजारी, सातारा या महिलेस किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच सखाराम ज्ञानू लोहार यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार इष्टे करीत आहेत.