सातारा शहरात भाजप सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी मोहीम जोमाने सुरु असून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे शहर सरचिटणीस चंदन घोडके यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये काल तब्बल ५०० हून अधिक नागरिकांनी नाव नोंदणी करून भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. 

भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित सदस्य नोंदणी मोहिमेला घोडके यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विस्तारक अविनाश खर्शीकर, किशोर गोडबोले, राजेंद्र वाळिंबे, धनंजय पाटील, मनीष महाडवाले, विजय नायक, सचिन तिरोडकर, सदाशिव नाईक, गजेंद्र ढोणे, विजय काटवटे, संदीप शिंदे, मसुद बारस्कर, दादा सपकाळ, विक्रम बोराटे, विलास कासार, चित्राताई माने, अश्विनीताई हुबळीकर, पल्लवी ताई घोडके, सारिका ताई ढाणे, राजेश माजगावकर, ऍड. विवेक जाधव, गौरी गुरव यांच्यासह राजधानी रिक्षा संघटना, क्षत्रिय ग्रुप, तसेच भारतीय जनता पार्टीचे विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्या, सदस्य होणाऱ्या नागरिकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेले सदस्य नोंदणीअभियान सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. यामध्ये सातारा जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट मनामध्ये ठेवून ही सदस्य नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली.  सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी करणाऱ्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. 

मागील बातमी
महावितरण राज्य क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती संघाची दमदार कामगिरी
पुढील बातमी
पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद

संबंधित बातम्या