सातारा : राखी बांधल्याचा फोटो सोशल मीडियावर स्टेटसला ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याच्या आरोपावरून चौघांविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राखी प्रशांत खामकर (रा. शाहूनगर), अजय पवार, बाबू व एका अनोळखी व्यक्तीचा संशयितांमध्ये समावेश आहे. याबाबत अनिकेत अशोक तपासे (रा. व्हिएंतो पार्क, पेढ्याचा भैरोबा पायथा, दरे खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील करीत आहेत.
राखी बांधल्याचा फोटो स्टेटसला ठेवल्याने जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा