जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली

2 ठार, तर 40 प्रवासी गंभीर

by Team Satara Today | published on : 06 May 2025


पूंछ :  जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एक प्रवासी बसचे नियंत्रण सुटल्याने सांगरा येथील मानकोट भागात एका दरीत कोसळली आहे. ही बस इतक्या वेगाने दरीत कोसळली की, दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 40 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

बसचे नियंत्रण सुटल्याने बस अचानक दरीत कोसळली. यामध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 40 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तत्काळ उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात आले आहे. या ठिकाणी प्राथमिक उपचार केलयावेर त्यांना राजौरी येथे हलवण्यात आले आहे.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, बस घनी गावातून मेंढर या ठिकाणी जात होती. बसचा अपघात सकाळी 9 ते 9.30 च्या सुमारास झाला. बसचा वेग जास्त असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. वेग जास्त असल्याने अनियंत्रित होऊन बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन,  सेना आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव
पुढील बातमी
'स्क्विड गेम ३'चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर

संबंधित बातम्या