सातारा स्थानिक गुन्हे शाखेसह उत्पादन शुल्क ची धडाकेबाज संयुक्त कारवाई

एक कोटी 91 हजाराची गोव्याची बनावट दारू जप्त; दोनजण ताब्यात

by Team Satara Today | published on : 29 April 2025


सातारा : राज्य उत्पादन शुल्क सातारा व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव, तालुका सातारा येथील महामार्गाच्या उरमोडी नदीकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवर स्थानिक गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क यांनी एकत्रित कारवाई करून एक कोटी 91 लाख रुपयांची गोवा राज्यातील बनावट दारू जप्त केली. 

याप्रकरणी सचिन विजय जाधव रा. अळसंद, ता. खानापूर, जि. सांगली व जमीर हरून पटेल रा. आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट दारूचा साठा आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना संबंधित ट्रक मधून बनावट दारू वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या अधिपत्याखालील पथकास संबंधित ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलीस यांनी महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर नदीच्या जवळ पहाटे साडेतीन वाजता सापळा रचला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकही या छाप्यामध्ये सहभागी होते.

संबंधित ट्रक टप्प्यात आलेला असताना पोलिसांनी ट्रक अडवून त्याची झडती घेतली. त्यावेळी संबंधित इसमांच्या ताब्यात असलेल्या ट्रकमध्ये रॉयल किंग स्पेशल माल्ट व्हिस्की, रॉयल ब्लॅक व्हिस्की अशा वेगवेगळ्या कंपनीच्या 84 लाख 41 हजार 40 विदेशी बनावटी दारूचा साठा व साडेसहा लाख रुपये किंमतीचा ट्रक असा माल आढळून आला.

या कारवाईमध्ये एक कोटी 91 लाख 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित इसमांवर बोरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक माधव चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फाळके, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, अमित झेंडे, अजय जाधव, रोहित शिंदे, मुनीर मुल्ला, अमोल माने, जयवंत खांडके, राजू कांबळे, शिवाजी भिसे, मनोज जाधव, स्वप्निल कुंभार, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, प्रवीण कांबळे, ओंकार यादव, रविराज वर्णेकर, धीरज महाडिक, केतन शिंदे, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, संभाजी साळुंखे यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुरुकुल स्कूलच्या कॅडेट्सचे एनसीसी 'ए' सर्टिफिकेट परीक्षेमध्ये उज्ज्वल यश
पुढील बातमी
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा

संबंधित बातम्या